चिखली गावाचा परिचय, इतिहास आणि ग्रामपंचायत समिती
ग्रामपंचायत चिखली ही सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक प्रगतशील व सामाजिक सलोखा जपणारी ग्रामसंस्था आहे. वारणा नदीकाठी वसलेले चिखली गाव निसर्गसौंदर्य, सामाजिक समता, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि सहकार चळवळीच्या इतिहासामुळे राज्यभर ओळखले जाते.
ग्रामपंचायत चिखलीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, सामाजिक सलोखा व पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देणे.
ग्रामपंचायत आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आधुनिक, स्वच्छ व आत्मनिर्भर चिखली घडविण्यास कटिबद्ध आहे.
| गावाचे नाव | चिखली |
| तालुका | शिराळा |
| जिल्हा | सांगली |
| राज्य | महाराष्ट्र |
| पिन कोड | ४१५४०८ |
| नदी | वारणा |
| महामार्ग | NH-4 (२६ किमी) |
| सांगली अंतर | सुमारे ८० किमी (पश्चिम) |
| साक्षरता दर | ८०.८१% |
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात चिखली गावातील सुपुत्र – कै. आनंदराव नाईक (तात्या), कै. विश्वासराव नाईक (भाऊ), कै. बापूसाहेब कदम यांनी मंगले येथील सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास भोगला. भारत सरकारने त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरविले.
स्वातंत्र्यपूर्व काळातच अस्पृश्यता न पाळणारे राज्यातील एकमेव गाव म्हणून चिखली ओळखले जाते. सामाजिक समता, बंधुता आणि ऐक्य यांचे हे गाव आजही जिवंत उदाहरण आहे.
चिखलीचे ग्रामदैवत काळम्मादेवी मंदिर हे धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे. येथे वार्षिक यात्रा व उत्सव होतात.
कै. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना हा परिसरातील आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
५ अंगणवाडी केंद्रे – बालकांचे पोषण, आरोग्य व प्राथमिक शिक्षण.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – गुणवत्तापूर्ण शिक्षण ०१ शाळा.
निवासी व अनिवासी माध्यमिक विद्यालय – १ शाळा.
कला, विज्ञान व वाणिज्य शाखांचे महाविद्यालय – १.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चिखली – माता व बालसंगोपन, लसीकरण, प्राथमिक उपचार.
नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे उपलब्ध.